Saturday, April 29, 2023

दुधी भोपळ्याचे थालीपीठ


 

साहित्य :-
 

  • १ मध्यम आकाराच्या दुधी भोपळा 
  • १ मध्यम कांदा किसून 
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • १ वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने 
  • १ वाटी नाचणीचे पीठ 
  • २ वाट्या गव्हाचे पीठ 
  • १ चमचा तिखट 
  • हळद 
  • हिंग 
  • १/२ चमचा ओवा 
  • १ चमचा धने पावडर 
  • तेल आणि चवीनुसार मीठ 
कृती :-
 

  • दुधी भोपळा किसून घ्यावा. ( पिळून पाणी काढू नये ) 
  • त्यात किसलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मेथी तिखट, धणे पावडर, हळद, हिंग, ओवा, मीठ, नाचणीचे पीठ आणि गव्हाचे पीठ घालावे. 
  • पाणी न टाकता,  छान मळून घ्यावे. किसलेल्या दुधी व कांद्यामुळे पाणी सुटते म्हणून वेगळे पाणी घालावे लागत नाही. तरीही पीठ सैलसर होते. थापायचे असल्याने सैल असले तरी चालते. 
  • पोळपाटावर एक स्वच्छ रुमाल, ओळ करून पसरवून ठेवावा. त्यावर तयार पिठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन थापून घ्यावा, 
  • रुमाल अलगद उचलून, गरम तव्यावर पालथा करावा. थालीपीठ तव्यावर टाकून, रुमाल अलगद काढून घ्यावा. 
  • मंद गॅसवर दोन्ही बाजू तेल लावून,छान भाजून घ्यावा. स्वादिष्ट थालीपीठ तयार... 
  • लोणचे किंवा चटणीसोबत सर्व्ह करावे.  

आंब्याची कढी


 

आपण आज बघूया आंब्याची कढी बनवण्याचे साहित्य आणि कृती.

साहित्य :-
 

  • एक खवलेला नारळ 
  • एक मध्यम कैरी उकडलेली 
  • गुळ, मीठ 
  • फोडणीसाठी अर्धा टीस्पून तेल, 
  • अर्धा चमचा मेथीचे दाणे 
  • ४ सुक्या मिरच्ा
     
कृती :- 

  • कैरी उकडून तिचा गर काढून घ्यावा. 
  • नारळाचं दुध काढून घ्यावं ( आवडेल तितक पातळ ) 
  • नारळाच्या दुधात गुळ विरघळून घ्यावा. 
  • कैरीचा गर थोडा थोडा करून नारळाच्या दुधात मिळावा. कैरीच्या आंबटपणावर किती गर लागेल ते अवलंबून असतं. सगळा गर लागेलच असंही नाही. 
  • चवीप्रमाणे मीठ घालून कढी उकळण्यास ठेवावी. 
  • फक्त अर्धा चमचा तेल घेऊन फोडणीसाठी तापत ठेवाव. तेल तापलं की, त्यात मेथीचे दाणे घालावेत आणि सुक्या मिरच्यांचे तुकडे घालून चमच्याने फोडणी जरा परतवून मगच कढीत घालावी. 

ज्वारीचे डोसे


ज्वारीचा हा सोप्पा पदार्थ...लहान मोठ्यांना खायला नक्कीच आवडेल. आपण आज ज्वारीचे डोसे कसे बनवायचे ते पाहूया.
 

साहित्य :- 

  • ज्वारीचे पीठ एक वाटी 
  • तांदुळाचे पीठ अर्धी वाटी 
  • एक मोठा कांदा 
  • दोन हिरव्या मिरच्या 
  • चवीपुरते मीठ 
  • हिंग 
  • हळद 
  • तेल
     
कृती :- 

  • कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरचीचे बारीक तुकडे करावे.
  • ज्वारीचे पीठ तांदुळाचे पीठ ,कांदा, मिरची, हळद. हिंग हे सर्व एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालत जावे.
  • हे मिश्रण जास्ती जाड असू नये. तांदळाचे घावणे करण्यासाठी जेवढी पातळ करतो त्याप्रमाणे करावे. 
  • मिश्रणात १ चमचाभर तेल घालावे. 
  • दहा मिनिटे झाकून ठेवावे. 
  • फ्राय पॅॅन गरम करून घ्यावा आणि त्यावर पळीने पातळ डोसे घालावे. दोन्ही बाजूनी शेकवून घ्यावे. 
  • चटणी सॉस किंवा दही साखर या बरोबर सर्व्ह करावे. 
  • वर दिलेल्या साहित्यात पाच ते सहा डोसे होतात. 

कच्च्या केळ्याचे पॅॅटीस


 

कच्च्या केळ्याचे पॅॅॅॅटीससाठी लागणारे साहित्य :-
 

  • अर्धा किलो कच्ची केळी 
  • रवा १ वाटी 
  • तिखट मीठ चवीनुसार 
  • ८-१० लसूण पाकळ्या 
  • आल्याचा तुकडा 
  • ४-५ हिरवी मिरची 
  • तेल 
कृती :-
 

  • कच्ची केळी साली सहित कुकरवर शिजवून घ्यावी. शिजवताना पाणी जास्त घालू नये. ४-५ शिट्या पुरे आहेत. 
  • कुकर थंड झाल्यावर, केळीची साले सुटतात. त्यातला गर काढून, कुस्करून लगदा करून घ्यावा. 
  • त्यात मीठ, आले लसूण मिरची पेस्ट, असे मिक्स करून घ्यावी. 
  • याचे लहान पॅॅॅटीस तयार करून घ्यावे. 
  • एका प्लेट मध्ये कोरडा रवा, त्यात मीठ न जरासे तिखट असे मिक्स करावे. 
  • पॅॅटीस दोन्ही बाजूंनी हे मिश्रण लावून घ्यावे.
  • फ्राइंंग पॅॅनमध्ये दोन्ही बाजूनी खमंग शॅॅलो फ्राय करून घ्यावे. 
  • चती / दही / सॉस सोबत गरम सर्व्ह करावे. 

आवळा कँडी


 

आज आपण लहान मुलांना आवडणारी आवळा कँँडी बनवणार आहोत.
 

साहित्य :- 

  • आवळे 
  • साखर 
  • पाणी 
  • पिठीसाखर
     
कृती :- 

  • आवळे धुवून पुसून कोरडे करून घ्यावे. 
  • प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून डिप फ्रीजरमध्ये २ दिवस ठेवावे. २ दिवसांनी बाहेर काढून ठेवावे thawing होऊ द्यावे. 
  • thawing झाल्यावर त्यातील बिया काढून पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. ( सहज करता येतात ).
  • साखरेचा पक्का पाक करावा आणि गार होऊ द्यावा, आवळ्याच्या पाकळ्या पाकात ३ दिवस मुरवत ठेवाव्यात, सगळ्या पाकळ्या बुडतील एवढा पाक असावा, रोज आवळ्याचा रस निघेल तो काढून टाकावा, पूर्ण पाक काढू नये, ( या रसाचे सरबत करता येते. ) 
  • तीन दिवसांनी आवळे साधारण कोरडे वाटतील. एका ताटात पिठीसाखर घ्यावी. आवळ्याची १-१ पाकळी त्यात घोळवून एखादा जाड प्लास्टिकच्या कागदावर काढून ठेवावे. 
  • ७-८ तास सावलीतच वाळू द्यावे. 
  • आवळा कँँडी तयार. 

सुके बोंबील फ्राय


 

आज आपण सुके बोंबील फ्राय या पदार्थाबद्दल जाणून घेऊ. साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे आहे.
 

साहित्य :- 

  • सुके बोंबील- १०-१२ 
  • लाल मिरच्या- ७-८ 
  • कांदा-१ 
  • लसूण पाकळ्या- १०-१२ 
  • आलं- १ छोटा तुकडा 
  • जीरा- १ चमचा 
  • मीठ- चवीनुसार 
  • साखर- १ चमचा 
  • पाणी- १/४ कप/ गरजेनुसार 
  • तेल- २ चमचे / गरजेनुसार
     
कृती :- 

  • सुके बोंबील नेहमीप्रमाणे साफ करून घ्या. त्याचे डोके, शेपूट कापून टाका व धुवून घ्या. तुकडे करू नका. तप पूर्ण फ्राय करायचा आहे. 
  • मिक्सरमध्ये कांदा, लाल मिरच्या, लसूण, आलं, साखर, मीठ, जीरा, जाडसर वाटून घ्या. आवश्यक तेवढेच पाणी टाका. पातळ करू नका. 
  • नंतर बोंबीलला वरील वाटप लावून घ्या.
  • गॅसवर पॅॅन ठेवून तेल टाका. नंतर त्यात बोंबील टाका. 
  • नंतर १/४ कप किंवा बोंबील बुडतील एवढ पाणी टाका. 
  • झाकण ठेवून बोंबील शिजू द्या. पाणी सुकल म्हणजे बोंबील शिजले का ते पहा. आवश्यक वाटल्यास किंचित पाणी टाका. 
  • पाणी सुकले की बोंबील फ्राय तयार आहेत. 
  • गरमागरम चपाती / भाकरीसोबत सर्व्ह करा.  

सफरचंद हलवा


 

आज आपण सफरचंदापासून हलवा बनवणार आहोत. चला तर मग बघूया या पदार्थाची साहित्य आणि कृती.
 

साहित्य :- 

  • ५ सफरचंद 
  • ४ चमचे तूप ( आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ) 
  • पाऊण वाटी साखर 
  • वेलची पूड 
  • साय 
  • काजू, बदाम 
कृती :-
 

  • सफरचंद धुवून, त्याचे २ काप करून त्यामधल्या बी काढून कीस करून घ्या. 
  • कढईमध्ये तूप घ्या. 
  • तूप गरम होत आले की, काजू, बदाम तुपावर २ मी. परतून घ्या. 
  • आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून, सफरचंदातील पाणी कमी होईपर्यंत छान परतून घ्या. 
  • १५ मिनिटे झाल्यावर त्यामध्ये साखर, वेलची पूड घालून ते एकत्र करून घ्या. 
  • एक सारख मध्यम आचेवर हलवत राहायचं आहे. 
  • २ मिनिटांनी साय घालून एकत्र करून घ्या. 
  • मिश्रण जाडसर होईपर्यंत आणि कढईपासून वेगळे झाले की, आपला सफरचंदाचा हलवा तयार आहे.  
  • सफरचंद धुवून, त्याचे २ काप करून त्यामधल्या बी काढून कीस करून घ्या. 
  • कढईमध्ये तूप घ्या. 
  • तूप गरम होत आले की, काजू, बदाम तुपावर २ मी. परतून घ्या. 
  • आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून, सफरचंदातील पाणी कमी होईपर्यंत छान परतून घ्या. 
  • १५ मिनिटे झाल्यावर त्यामध्ये साखर, वेलची पूड घालून ते एकत्र करून घ्या. 
  • एक सारख मध्यम आचेवर हलवत राहायचं आहे. 
  • २ मिनिटांनी साय घालून एकत्र करून घ्या. 
  • मिश्रण जाडसर होईपर्यंत आणि कढईपासून वेगळे झाले की, आपला सफरचंदाचा हलवा तयार आहे.  

उपवासाची दही बटाटा पुरी


 

आज आपण उपवासाची दही बटाटा पुरी बनवणार आहोत. 

साहित्य :-
  • केळ्याचे वेफर्स 
  • उकडलेला बटाटा 
  • जिरेपूड 
  • मीठ 
  • तिखट 
  • दही 
  • साखर 
  • खजूर चटणी 
  • बटाटा शेव 
कृती :-
 

  • उकडलेला बटाटा कुस्करून त्यात थोडस मीठ, जिरपूड घालून नीट मिसळून घ्यावा. 
  • दही फेटून त्यात थोडी साखर मीठ घालून घ्यावं.
  • आता केळ्याचे वेफर्स एका ताटलीत मांडून घ्यावेत.
  • त्यावर मिक्स करून घेतलेला बटाटा मावेल एवढा ठेवावा, त्यावर सारखं केलेलं दही घालावं त्यावर खजूर चटणी घालावी, त्यावर बटाटा शेव घालावी. 
  • दही बटाटा पुरी तयार. 

तवशाचे लोणचे


 

आज आपण तवशापासून लोणचे तयार कसे ते पाहूया.
 

साहित्य :- 

  • तवशाचे तुकडे २ वाट्या 
  • लाल मोहरीची पूड २-३ चमचे 
  • उकळून गार केलेलं पाणी - अर्धी ते पाऊण वाटी 
  • पोपटी मिरच्यांची भरड १ टीस्पून 
  • मीठ चवीनुसार 
  • फोडणी :- तेल- ४-५ टीस्पून, मोहरी, हिंग, हळद 
कृती :-
 

  • तवशाची साल आणि बिया काढून त्याचे १ से. मी. चे क्युब्स करावे. 
  • पोपटी मिरच्या भरड वाटाव्यात. दगडी खलबत्यात वाटल्यास मिरचीहून हिरवे, नाहीतर मिक्सर आहेच. 
  • मोहरीची बारीक पूड पाण्यात घालून फेटून घ्यावी. 
  • त्यातच मीठ घालून घ्यावे. 
  • हे पाणी, तवशाचे तुकडे, मिरचीचा ठेचा एकत्र करून चांगले ढवळावे. 
  • गार झालेली फोडणी घालावी. 

नारळाची मिठाई


 

नारळापासून मिठाई कशी बनवतात ते आपण आज पाहणार आहोत.
 

साहित्य :- 

  • एक नारळ 
  • २०० ग्रॅम खवा 
  • २०० ग्रॅम साखर 
  • सुकामेवा- काजू 
  • बदामाचे काप 
  • बेदाणे 
  • २ चमचे तूप 
कृती :-
 

  • नारळ खवून घ्या. 
  • खवा जाड बुडाच्या भांड्यात २ चमचे तुपावर भाजा, पण रंग बदलू देऊ नका किवा खाली लागू देऊ नका.
  • नारळ आणि साखर एकत्र करून गॅसवर ठेवा, सतत ढवळा. 
  • साखर विरघळून मिश्रण थोडे घट्टसर झाले, की खवा मिसळा. 
  • खवा मिसळला की, मिश्रण पातळ होईल. ते घट्ट होईपर्यंत आवळत रहा. 
  • कोमट झाले की, हव्या त्या आकाराची मिठाई करा/ लाडू वळा. 
  • वरून सुकामेवा लावा. 
  • अशाप्रकारे तयार आहे नारळाची स्वादिष्ट मिठाई.  

पपईचे धपाटे


 

आज आपण पपईपासून एक नवीन पदार्थ याची साहित्य आणि रेसिपी बघूया. 

साहित्य :-
 

  • चांगल्या पिकलेल्या, गोड असलेल्या पपईचे तुकडे २ मोठ्या वाट्या 
  • पाच सहा भाकरी होतील एवढे ज्वारीचे पीठ 
  • २  चमचे डाळीचे पीठ 
  • १ चमचा ओव्याची पूड 
  • २-३ चमचे तीळ 
  • १-२ चमचे धने जिरे पूड 
  • हव्या त्या प्रमाणात तिखट 
  • मीठ 
  • हळद 
  • आवडत असल्यास बारीक चिरून कोथिंबीर
     
कृती :- 

  • पपईच्या तुकड्यांचा मिक्सरमध्ये रस करून घ्या. 
  • ज्वारीच्या पिठात सर्व जिन्नस मिसळून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्या. भिजवताना अजिबात पाणी घालायचे नाही. 
  • भाकरीसारखेच पिठावर थापून घ्या. 
  • भाजताना तव्यावर पीठ लावलेली बाजू येईल अशा पद्धतीने टाका.
  • दोन्ही बाजून तेलान हात लावून भाजून घ्या,
  • खाताना बरोबर तूप, लोणी किंवा दही, ताक-दुध, दही-दुध घ्या. 
  • मिरचीचा ठेचा किंवा दाण्याची चटणी,जवसाची चटणी वैगेरे बरोबर मस्त लागतो. 

कलिंगड सरबत


 


टोमॅॅटो डोसा


काकडीचे सूप


नाचणीचे पापड



बिटाचा ज्युस


आवळ्याचे सरबत


 

उपवासाचे अनारसे



अंडा ब्रेड पॅॅटीस




खेकड्याचा मालवणी रस्सा


नारळाची बर्फी



पौष्टिक मेथीचे लाडू


 

चविष्ट आणि कुरकुरीत पोहा डोसा


चविष्ट अंड्याचे कटलेट


छोले मसाला भाजी


 

Friday, April 28, 2023

रव्याचा उपमा


 


रवा लाडू


मैदा बर्फी


 

पौष्टिक मूग डाळ इडली


 

कोल्ड कॉफी


 

गव्हाच्या पीठाचे पौष्टिक बिस्कीट


 

अंडा पराठा


 

पोहा ढोकळा


अळूच्या गाठींची भाजी


 

रवा पकोडा


कच्चा केळ्याचे काप


 

ओव्याच्या पानाची भजी


 

थंडगार मिल्कशेक


 

सोपा आणि स्वादिष्ट घरगुती बर्गर


 

बीटरूट पराठा


झटपट व पौष्टिक दुधी भोपळ्याचे भरीत


         झटपट होणारा, पौष्टिक, चटपटीत आणि महाराष्ट्रीय पदार्थ दुधी भोपळ्याचे भरीत. 

चमचमीत आणि मस्तच दही मिसळ


अगदी सोप्या पद्धतीने करा कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी!


            चटपटीत, मसाला घालून केलेली 'कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी' तोंडाला चवच आणेल. 

उन्हाळ्यासाठी स्पेशल गुलाबाचे सरबत!


       'गुलाबाचे सरबत' हे उष्णता आणि थकवा घालविणारे शरीरात थंडावा ठेवणारे उन्हाळ्यामध्ये याचा अवश्य उपयोग होईल. 

बटाट्याचे पुडिंग


 


साबुदाण्याची लापशी


रुचकर कांदे पोहे


 साहित्य :-   १)४ मुठी जाडे पोहे २)१ कप बारीक चिरलेला कांदा ३)१/४ कप शेंगदाने  ४)२ हिरव्या मिरच्या ५) १/४ चमचा हळद ६) १/४ चमचे मोहरी ७) १/४ चमचे हिंग ८) ३-४ कढीपत्ता ९) १ टेबलस्पून ओल खोबरं १०) १/४ चमचा साखर ११) १ टेबलस्पून कोथिंबीर १२) २ चमचे लिंबूरस १३) मीठ चवीप्रमाणे 

कृती :- 

  1. जाडे पोहे साध्या पाण्याने २ वेळा धुवून घ्या. पाणी पूर्ण गाळून टाका.
  2. पोहे चांगले भिजल्या नंतर पोह्यांमध्ये हळद , मीठ साखर टाका.
  3. कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिरवी मिरची,कढीपत्ता, हिंग घाला 
  4. नंतर कांदा घालून २ मिनिट परतून त्यात मटार घालून झाकण ठेवा.
  5. कांदा शेंगदाणे शिजली की त्यात भिजवलेले पोहे घालावेत. आणि ते मिक्स करावे. तेल आणि परतलेला कांदा सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी.मध्यम आचेवर वाफ काढावी. 
  6. चवीनुसार मीठ घालावे .लिंबू रस मिक्स करा. 
  7. नंतर ओल खोबर आणि कोथिंबीर घालावी. 
               अशा प्रकारे गरमा गरम पोहे तयार आहेत.

पौष्टिक आणि चविष्ट दुधी हलवा


          दुधीसारख्या नावडत्या आणि बेचव भाजीपासून बनवला जाणारा दुधी हलवा हा पदार्थ गोड पदार्थांपैकी सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट दिश मानली जाते. म्हणूनच दुधीची भाजी म्हटलं की नाक मुरडणारी ही मंडळी दुधीचा हलवा मात्र मिटक्या मारून खातात. जितका हा स्वादिष्ट आहे तितकाच ही डिश बनवण्यास सोपी मानली जाते. आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी व आवडत्या व्यक्तीला खाऊ घालून खुश करा. 


Thursday, April 27, 2023

तिळाची परफेक्ट चटणी बनवता येत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.



          भारतातील जेवणाची थाळी विविध प्रकारच्या चटण्यांशिवाय अपूर्ण आहे. जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी चटणी ही हवीच असते. भारतातील प्रत्येक भागांमध्ये विविध प्रकारच्या चटण्या प्रसिध्द आहेत. 

साऊथ इंडियन कुरकुरीत डाळ वडा बनवा घरच्या घरी