साहित्य :
- २ वाट्या मूग डाळ
- २ चमचे तेल
- १/२ वाटी गाजर बारीक चिरून
- २ चमचे दही
- १/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरून
- फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग, कडीपत्ता, हिरवी मिरची, आले, हरभरा डाळ, काजूचे तुकडे
- चवीनुसार मीठ
कृती :
- प्रथम २ वाट्या मूगाची डाळ, स्वच्छ पाण्याने २-३ वेळा धुऊन, पाणी घालून २ तास पाण्यात भिजवून ठेवली.
- २ तासानंतर मूग डाळ मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतली.
- मग त्या डाळीमध्ये मिश्रणात २ चमचे दही, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घेतले.
- नंतर एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात मोहरी, जीरे, हिंग यांची फोडणी करून घेतली.
- मग त्याच फोडणी मध्ये कडीपत्ता , आले, काजूचे तुकडे, मिरचीचे तुकडे किसलेले गाजर घातले.
- ही फोडणी मुगाच्या पिठात मिक्स करून घेतले. गम त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करून घेतले.
- १० मिनिटांनी हे मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर, इडली पात्राला तेल लावून त्यात इडल्या वाफवून घेतल्या.
- अशा प्रकारे पौष्टिक मूगडाळ इडली तयार होईल.
No comments:
Post a Comment