Friday, April 28, 2023

बटाट्याचे पुडिंग


 




बटाट्याचे पुडिंग करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१) ५०० ग्रॅॅम बटाटे 

२) २५० ग्रॅॅम साखर 

३) १०० ग्रॅॅम खवा 

४) अर्धी वाटी तूप 

५) २-३ वेलदोडे पूड 

६) २ चिमट्या केशर 

७) १ वाटी ओले खोबरे 

८) बदाम 

९) काजू. 


बटाट्याचे पुडिंग करण्याची कृती :- 

१) केशर गरम करून बारीक करावे व थोड्या गरम पाण्यात शिजत ठेवावे. 

२) बटाटे उकडून सोलावे व गरमच असताना पुरणयंत्रात घालून बारीक करावे किंवा किसणीने किसावे. 

३) साखरेत अर्धी वाटी पाणी घालून गॅॅस वर ठेवावे व दोनतारी पाक करावा. 

४) जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की त्यावर बटाट्याचे मिश्रण परतावे. 

५) भिजलेले केशर पाकात घालावे व पाक बटाट्यावर ओतावा. 

६) खवा मोकळा, कुस्करून घालावा. 

७) मिश्रण एकजीव होईपर्यंत सतत ढवळावे.

८) खाली उतरवून सुबकशा भांड्यात घालावे. वरून वेलदोडे पूड, बदाम, काजू व  थोडे ओले खोबरे घालावे. 

        अशा प्रकारे तयार आहे बटाट्याचे पुडिंग. लहान मुलांसाठी व उपवास असलेल्या मंडळींसाठी एक वेगळा पदार्थ. 

No comments:

Post a Comment