Friday, April 28, 2023

अळूच्या गाठींची भाजी


 


साहित्य : 

  • ६-७ अळूची पाने 
  • १ मध्यम आकाराचा कांदा 
  • १ टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचा कीस 
  • ३-४ लसूण पाकळ्या 
  • २-३ कोकम 
  • १/२ टेबलस्पून गूळ 
  • १/२ टेबलस्पून गरम मसाला 
  • १/२ टेबलस्पून लाल तिखट 
  • १/४ टेबलस्पून हळद 
  • १/२ टेबलस्पून मीठ 
  • १ टेबलस्पून तेल
     
कृती : 

  • आदल्या दिवशी रात्री अळूची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत . 
  • दुसऱ्या दिवशी पाने मधून कापून त्याच्या गुंडाळी कारून गाठी करून घ्याव्यात. 
  • गॅॅसवर दोन कप पाणी गरम करून त्यात कोकम, थोडं मीठ घालून अळूच्या गाठी एक ते दोन मिनिटे ठेऊन अळूच्या गाठी काढून घ्याव्यात. 
  • कांदा बारीक चिरून घ्यावा. लसूण सोलून घ्यावी. गॅॅसवर एका पॅॅनमध्ये तेल घेऊन त्यात फोडणी करून कांदा घालावा. 
  • कांदा परतून त्यात मसाले, मीठ घालून अळूच्या गाठी घालाव्यात. 
  • कोकम व गूळ घालून सर्व मिक्स करून त्यात वरून खोबर घालून एकत्र करून दोन ते तीन मिनिटे झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्यावी. 
  • अशा प्रकारे अळूच्या गाठींची चवदार भाजी तयार होईल. भाकरी सोबत सर्व्ह करू शकता. 

No comments:

Post a Comment