Friday, April 28, 2023

थंडगार मिल्कशेक


 


साहित्य : 

  • १ लिटर दूध 
  • २०० ग्राम साखर 
  • १ कप क्रीम 
  • १ लहान चमचा वेलची पावडर 
  • थोडं केशर
  • खाण्याचा गोड रंग 
  • बारीक केलेले सुखे मेवे 
  • व्हॅॅनिला इसेन्स 
  • बर्फ
     
कृती : 

  • दुधात साखर मिसळून चांगले उकळून घ्या. 
  • थंड करून त्यात वेलची पावडर, इसेन्स आणि क्रीम मिसळा. 
  • ह्याचे तीन वाटे करा. एका मध्ये हिरवा रंग घाला दुसऱ्या मध्ये केशर घाला आणि तिसऱ्याला पांढराच राहू द्या. 
  • तिन्ही भाग फ्रीजर मधे थंड होण्यासाठी ठेवा. 
  • नंतर प्रत्येक मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्या. काचेच्या ग्लासात आधी बर्फाची चुरी घाला. हिरव्या रंगाचे दूध, बर्फ, केशरी दूध, बर्फ  आणि शेवटी पांढरे दूध या पद्धतीने भरा. 
  • त्यावर आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप घाला. 
  • अशा प्रकारे थंडगार मिल्कशेक तयार होईल. 

No comments:

Post a Comment