Friday, April 28, 2023

कोल्ड कॉफी


 

साहित्य : 

  • २ कप थंडगार दूध 
  • ४ ते ५ चमचे साखर 
  • २ चमचे इंस्टंंट कॉफी पावडर 
  • २ चमचे चॉकलेट सिरप 
  • ४ चमचे फ्रेश क्रीम 
  • ५ ते ६ आईस क्युब्स
     
कृती : 

  • कोल्ड कॉफी बनवताना सर्वप्रथम दूध चांगले उकळून ते थोडे थंड झाले की ते जास्त थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे ते चांगले थंडगार होईल. 
  • मग एक छोटासा बाऊल घ्या आणि त्या बाऊल मध्ये २ चमचे कॉफी घाला आणि त्यामध्ये ४ चमचे पाणी घालून त्यामध्ये कॉफी मिक्स करून ते ६ ते ७ मिनिटे बाजूला ठेवा. 
  • आता मोठे मिक्सरचे भांडे घ्या आणि त्यामध्ये दुधामधील २ कप  दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि मग त्यामध्ये आपण पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेले कॉफी घाला आणि ती ३ ते ४ सेकंद मिक्सरच्या भांड्याला गच्च झाकण लावून मिक्सरवर चांगली गुसळून घ्या. 
  • मग त्यामध्ये फ्रेश क्रीम घाला आणि परत कमी वेगावर ते मिश्रण चांगले फिरवून घ्या त्यामुळे फ्रेश क्रीम दुधामध्ये चांगले मिक्स होईल आणि कॉफी घट्ट देखील होईल. 
  • आता त्यामध्ये साखर आणि चॉकलेट सिरप घाला आणि परत मिक्सरवर गुसळून घ्या. 
  • शेवटी यामध्ये बर्फ घाला आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरवर ३ ते ४ सेकंद फिरवून घ्या. 
  • नंतर टी कप मध्ये ओता आणि त्यावर थोडी फ्रेश क्रीम आणि चॉकलेट सिरपने सजवा. 
                   अशा प्रकारे थंडगार कोल्ड कॉफी तयार होईल.  

No comments:

Post a Comment