Saturday, April 29, 2023

खेकड्याचा मालवणी रस्सा



साहित्य : 

  • ७ समुद्राचे खेकडे 
  • ४ मध्यें आकाराचे कांदे, १० लसूण पाकळ्या 
  • १ चमचा चिंचेचा कोळ 
  • १ मोठी वाटी ओले खोबरे 
  • ७ लवंग, १ दालचिनीचा तुकडा, ७ काळीमिरी, १ चमचा धने, १ चमचा बडीशेप 
  • २ चक्र फुलाची पाकळी व थोडासा  बादा 
  • १ चमचा लाल तिखट 
  • १/२ चमचा हळद 
  • २ पळी तेल फोडणीसाठी 
  • मीठ चवीनुसार 
  • कोथिंबीर 
कृती : 

  • प्रथम बाजारातून समुद्राचे खेकडे आणल्यावर ते स्वच्छ धुवून साफ करून थोडेसे मीठ लावून पंधरा मिनिटे ठेवावेत. 
  • पसरट भांड्यात एक चमचा तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात सर्व खडा गरम मसाला व एक कांदा उभा चिरून आणि पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून त्याबरोबरच परतून घ्याव्यात नंतर ओलं खोबर ही तांबूस रंगात परतून घ्यावे. 
  • आणि नंतर हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. 
  • एका पसरट भांड्यात तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस रंगावर परतल्यावर त्यात हळद आणि लाल मिरची पावडर घालून त्यावर साफ केलेले खेकडे आणि गरजेनुसार मीठ घालून नीट ढवळून दोन मिनिट झाकून ठेवावे. 
  • त्यानंतर त्यात कांदा खोबरं आणि गरम मसाल्याचे वाटण त्याचप्रमाणे चिंचेचा कोळ आणि गरजेप्रमाणे मीठ टाकून पाच मिनिट छान उकळून घ्यावे, नंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. 
  • अशा प्रकारे चमचमीत खेकड्याचा मालवणी रस्सा तयार होईल. 

No comments:

Post a Comment