आज आपण उपवासाची दही बटाटा पुरी बनवणार आहोत.
साहित्य :-
- केळ्याचे वेफर्स
- उकडलेला बटाटा
- जिरेपूड
- मीठ
- तिखट
- दही
- साखर
- खजूर चटणी
- बटाटा शेव
- उकडलेला बटाटा कुस्करून त्यात थोडस मीठ, जिरपूड घालून नीट मिसळून घ्यावा.
- दही फेटून त्यात थोडी साखर मीठ घालून घ्यावं.
- आता केळ्याचे वेफर्स एका ताटलीत मांडून घ्यावेत.
- त्यावर मिक्स करून घेतलेला बटाटा मावेल एवढा ठेवावा, त्यावर सारखं केलेलं दही घालावं त्यावर खजूर चटणी घालावी, त्यावर बटाटा शेव घालावी.
- दही बटाटा पुरी तयार.
No comments:
Post a Comment