साहित्य :
- ७ ते ८ आवळे
- १ चमचा किसलेले आले
- साखर
- २ चमचे लिंबूचा रस
कृती :
- आवळे कुकरमध्ये वाफवून घ्यावे. बिया काढून फक्त गर घ्यावा.
- गराच्या दीडपट साखर घावी (गोड जास्त आवडत असल्यास साखर थोडी जास्त घेतली तरी चालेल)
- साखर , आवळ्याचा गर, आले आणि लिंबाचा रस एकत्र करून घट्टसर पल्प बनवा.
- हा पल्प प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावा.
- सरबत बनवताना २ ते ३ चमचे पल्प घेऊन त्यात २ चिमटी मीठ घालावे. आणि ग्लासभर पाणी घालावे.
- अशा प्रकारे आवळ्याचे थंडगार सरबत तयार होईल.
No comments:
Post a Comment