साहित्य :
- १ कप कणीक
- १/२-३/४ कप साजूक तूप
- १/२ कप बेसन
- १/३ कप पिठी साखर
- १/२ चमचे दालचिनी पूड
कृती :
- सर्व साहित्य एकत्र ठेवावे. एका भांड्यात कणीक, बेसन पिठी साखर आणि दालचिनी पूड टाकून मिक्स करून घ्यावे.
- आता त्यात साजूक तूप टाकावे. आणि त्याचा गोळा बनवून घ्यावा. आवश्यकता वाटल्यास आणखी थोडे तूप टाकावे.
- १० मिनिटे झाकून ठेवावे.
- नंतर त्याचे सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे. बिस्किटाचा आकार देऊन आवडेल त्या प्रमाणे, त्यावर डिझायनिंग करू शकतो.
- तळण्याच्या जाळीने डिझाईन देऊ शकता.
- त्या पूर्वी कुकरमध्ये बिस्कीट बेक करण्यासाठी, कुकर गरम करायला ठेवला पाच मिनिट. त्यात जाळी ठेवून, त्यात तयार केलेल्या बिस्कीट ची प्लेट ठेवली.
- साधारण १५-२० मिनिटे कमी ते मध्यम आचेवर.
- त्याच प्रमाणे काही बिस्कीट ओव्हन मध्ये करू शकता. साधारण १५ मिनिटे ठेवा.
- थंड झाल्यावर काढून घ्यावेत.
- अशा प्रकारे पौष्टिक घरगुती कणकेचे बिस्कीट तयार होईल.
No comments:
Post a Comment