Friday, April 28, 2023

झटपट व पौष्टिक दुधी भोपळ्याचे भरीत


         झटपट होणारा, पौष्टिक, चटपटीत आणि महाराष्ट्रीय पदार्थ दुधी भोपळ्याचे भरीत. 




दुधी भोपळ्याचे भरीत करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • १ मध्यम आकाराचा भोपळा 
  • २ मोठे कांदे 
  • १ छोटा टोमॅॅटो 
  • ५-६ लसूण पाकळ्या 
  • २ चमचे शेंगदाणे 
  • २ चमचे शेंगदाणे 
  • १  चमचा लाल तिखट 
  • २ चमचे तेल 
  • आवडीनुसार कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ. 

दुधी भोपळ्याचे भरीत करण्याची कृती :- 

  • सर्वात आधी भोपळा स्वच्छ धुवून कोरडा करावा. 
  • मग भोपळ्याला तेल लावून वांग जसे भाजतो तसे गॅॅसवर सर्व बाजूने भाजून घ्यावे. 
  • थंड झाल्यावर सुरीने काळा झालेला भाग काढावा, पूर्ण काढू नये. 
  • काळपट भाग काढून झाल्यावर भोपळा कुस्करून घ्यावा. 
  • आता गॅॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकावे आणि शेंगदाणे लालसर भाजून घ्यावेत. 
  • शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात कांदा परतून घ्यावा. 
  • त्यामध्ये लसूण, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यावे. 
  • परतल्यावर त्यात टोमॅॅटो टाकून मध्यम आचेवर परतून घ्यावे. 
  • आता कुस्करलेला भोपळा या मिश्रणात घालून व्यवस्थित परतून घ्यावा व पाच मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवावे. 
  • पाच मिनिटाने गॅॅस बंद करावा व त्यावर कोथिंबीर पसरावी. 
  • ज्यांना वांग्याचा त्रास होतो त्यांनी दुधी भोपळ्याचे भरीत करून पहावे.  
                  तयार आहे झटपट दुधी भोपळ्याचे भरीत. 

No comments:

Post a Comment