साहित्य :
- १ बीट मध्यम
- १ टोमॅॅटो मध्यम
- १ गाजर मध्यम
- १/३ कप पाणी
- १/४ चमचे जीरेपूड
- मीठ साखर चवीनुसार
- १ चमचा लिंबाचा रस
कृती :
- बीट आणि गाजर प्रेशर कुकरमध्ये १ शिट्टी होईपर्यंत शिजवावे.
- नंतर गाजर आणि बीटाचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. टोमॅॅटो सुद्धा मध्यम चिरून घ्यावा.
- बीट, गाजर, आणि टोमॅॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे, अगदी गरज वाटली तरच थोडेसे पाणी घालावे.
- स्वच्छ कापडातून बीट-गाजर-टोमॅॅटो वाटण घट्ट पिळून गाळून घ्यावे.
- या ज्युसमध्ये जिरेपूड आणि मीठ घालून मिक्स करावे. यामध्ये साखर आणि लिंबाचा रस घालावा.
- अशा प्रकारे बीटाचा ज्युस तयार होईल.
No comments:
Post a Comment