Friday, April 28, 2023

सोपा आणि स्वादिष्ट घरगुती बर्गर


 



बर्गरसाठी साहित्य :- 

  • २ बन्स 
  • १ काकडी 
  • २ चीज कप 
  • ४-५ कोबी 
  • १ मोठा टोमॅॅटो
  • १ कांदा 
  • आवश्यकतेनुसार हिरव्या कोथिंबीरीची चटणी टोमॅॅटो सॉस आवश्यकतेनुसार 
  • चाट मसाला अर्धा चमचे. 

टिक्की बनवण्यासाठी साहित्य :- 

  • ३ उकडलेले बटाटे 
  • १/२ कप उकडलेले मटार 
  • १ चमचे आले पेस्ट 
  • १/४ चमचे आमचूर पावडर 
  • थोडे धणे पावडर 
  • थोडे जिरे पावडर 
  • १ हिरवी मिरची बारीक चिरून 
  • २-३ चमचे तेल मीठ चवीनुसार 
  • गरजेनुसार ब्रेडचे तुकडे किंवा दोन ब्रेड 
बर्गर बनवण्याची कृती :- 

सर्वप्रथम टिक्की बनवण्यासाठी बटाटे किसून घ्यावे. नंतर त्यात उकडलेले मटार मॅॅश करून घ्या. आता त्यात सर्व मसाले हळद, मीठ, जिरे, धणे पावडर, आल्याची पेस्ट, हिरवी मिरची आणि कुटलेले बारीक ब्रेड त्यात मिक्स करा. आता एका कढईत २ ते ३ चमचे तेल टाका. आणि पॅॅन गरम करून घ्या. आता पुढे बटाट्याच्या मिश्रणातून थोडे मिश्रण घ्या आणि त्याचा एक बॉल बनवा. मग त्याला नीट गोल करा आणि तळहातासह सपाट करा. 

नंतर ते ब्रेडच्या चुरा मध्ये पसरवा. तळहातासह हलके दाबून टिक्कीला आकार द्यावे. अशाप्रकारे सर्व टिक्की तयार करावे. टिक्की तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. हे सर्व झाल्यावर आता टिक्की तयार आहे. पुढे नंतर काकडी धुवून सोलून घ्या. त्याचे गोल काप करा. टोमॅॅटो चांगले धुवून गोल काप करून घ्या. आता बर्गर मधोमध कापून तव्यावर / पॅॅनमध्ये तेल ओता आणि दोन्ही बाजूंनी गरम करा. या प्रकारे दुसरा बनही बनवा. आता बर्गर बनवण्यासाठी सर्वप्रथम बनचा एक तुकडा घ्या. त्याला एक एक चमचा टोमॅॅटो सॉस लावा. मग काकडीचा तुकडा त्यात ठेवा. नंतर चाट मसाला शिंपडा त्यानंतर टिक्की ऍड करा. यावर कोबी घाला आणि नंतर चीजचे तुकडे ठेवा. कांद्याचे काप ठेवा. नंतर चाट मसाला आणि नंतर टोमॅॅटोचे काप टाका. बनचा दुसरा तुकडा घ्या, त्यावर हिरव्या कोथिंबीरची चटणी लावा. टोमॅॅटोच्या कापांच्या वर ठेवा. 

           अशा प्रकारे तयार आहे आपला घरगुती सोप्या पद्धतीने बनवलेला व स्वादिष्ट असा बर्गर. 

No comments:

Post a Comment