साहित्य :
- २ अंडी
- ३ ब्रेड स्लाइस
- १ कांदा
- १ टोमॅॅटो
- १/२ सिमला मिरची
- २ हिरव्या मिरच्या
- १ टेबलस्पून कोथिंबीर
- २ टेबलस्पून तेल
- १ चमचा चिली फ्लेक्स
- ट चमचा ओरिगॅॅनो
- १/४ चमचे हळद
- १/८ चमचे हिंग
- मीठ चवीनुसार
कृती :
- प्रथम अंडी बीट करून घेतली. कांदा, टोमॅॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची सर्व बारीक चिरून घेतले.
- मग एका भांड्यात बीट केलेले अंड, चिली फ्लेक्स, ओरिगॅॅनो, मीठ, हळद, हिंग हे मिक्स केले.
- आता या मिश्रणात कांदा, टमाटा, सिमला मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व बारीक केलेले घातले व चांगले मिक्स केले.
- आता तीन ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्या कडा कट करून घेतल्या व त्यातील एक वरील मिश्रणात दोन्ही साईड ने डीप करून घेतली. व गॅॅस वरील फ्राय पॅॅन मध्ये गरम तेलावर ठेवून त्यावर अंड्याचे मिश्रण पसरवले.
- मग दोन्ही बाजूंनी शॅॅलो फ्राय करून घेतले. अशा सर्व स्लाईस करून घेतल्या.
- अशा प्रकारे चवदार अंडा ब्रेड पॅॅटीस तयार होतील.
No comments:
Post a Comment