साहित्य :
- जरुरीप्रमाणे वरई तांदूळ
- साखर किंवा गूळ
- खसखस
- तूप
कृती :
- वरई तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत.
- मग उपसून स्वच्छ कपड्यावर अर्धवट वाळवावे. नंतर खलबत्यात चांगले बारीक कुटुन घ्यावेत.
- यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे. झाकून ठेवावे.
- नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत.
- त्यावर खसखस लावावी. लालसर रंगावर तळून घ्यावेत. सुंदर दिसतात
- अशा प्रकारे चविष्ट अनारसे तयार होतील.
No comments:
Post a Comment