साहित्य :
- १०० ग्रॅॅम रवा
- ३० ग्रॅॅम दही
- २ मोठे उकडलेले बटाटे
- २-३ टेबलस्पून उकडलेले मटार
- ४-५ हिरव्या मिरच्या
- १ आल्याचा तुकडा
- २ कांदे
- ३० ग्रॅॅम बेसनपीठ
- १/२ चमचे ओवा
- १/२ चमचे चाट मसाला
- चवीनुसार मीठ
- २५० ग्रॅॅम तेल
कृती :
- एका बाऊल मध्ये रवा व दही मिक्स करा.
- चॉपर मध्ये कांदा मिरची आलं टाकून बारीक करून घ्या उकडलेले मटार व बटाटे मॅॅश करून घ्या.
- कांदा व मटार बटाटा सर्व रव्यात मिक्स करा त्यातच ओवा चाटमसाला मीठ मिक्स करा व १० मिनिटे झाकून ठेवा
- नंतर त्यात बेसनपीठ मिक्स करून कढईट गरम केलेल्या तेलात पकोडा तळा.
- थोडा लालसर झाला की तळलेला पकोडा डिशमध्ये काढा.
No comments:
Post a Comment