Friday, April 28, 2023

मैदा बर्फी


 


साहित्य : 

  • १ वाटी मैदा 
  • १/२ वाटी पिठीसाखर
  • खाण्याचा हिरवा रंग 
  • १/२ चमचा वेलची पावडर 
  • १/२ वाटी तूप 
  • १ चमचा थोडे ड्राय फ्रुट्स
     
कृती : 

  • प्रथम एका पॅॅन मध्ये अर्धा वाटी तूप घालून मैदा चार ते पाच मिनिटांपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. आता तूप बऱ्याच प्रमाणात वर आलेले दिसेल . 
  • भाजलेला मैदा थोडा कोमट झाला की, त्यात वेलची पूड आणि पिठीसाखर घालून छान मिक्स करा. पैकी अर्ध्या मैद्याच्या मिश्रणात एक चमचा दुधात भिजवलेला खाण्याचा हिरवा रंग घाला व परत ते मिश्रण एका मिनिटांपर्यंत शिजवून घ्या. 
  • आता एका टीन वर बटर पेपर ठेवा . बटर पेपर नसल्यास एका चौकोनी भांड्याला तूप लावून घ्या.
  • आता त्यावर थोडे ड्रायफ्रुट्स पसरुन घ्या व आधी मैद्याच्या मिश्रणाची एक लेअर व परत हिरव्या रंगाची लेअर घाला. 
  • परत वरती थोडे ड्रायफ्रुट्स घालून बर्फी अर्धा तास रूम टेंपरेचर वर सेट होऊद्या. 
  • अर्ध्या तासनंतर सुरीच्या साह्याने मनासारख्या आकाराच्या बर्फी कट करा. 
  • अशा प्रकारे अतिशय कमी साहित्यात चवदार मैदा बर्फी तयार होईल.  

No comments:

Post a Comment