Saturday, April 29, 2023

चविष्ट अंड्याचे कटलेट


साहित्य : 

  • ७ उकडलेली अंडी 
  • २ उकडलेले बटाटे 
  • १/२ चमचे आलं 
  • ३ हिरव्या मिरच्या
  •  १ किंवा १/२ लसूण 
  • १ मोठा कांदा 
  • कढीपत्ता 
  • कोथिंबीर १ कप 
  • १ चमचा गरम मसाला 
  • १/२ चमचे काळी मिरी पावडर 
  • १/२ कप ब्रेड क्रम्ब्स 
  • १/२ चमचे धनिया पावडर 
  • १/२ चमचे लाल तिखट 

कृती : 

  • सर्वप्रथम एका पॅॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, मीठ, काळी मिरपूड आणि गरम मसाला घाला आणि परतून घ्या. 
  • आता हे साहित्य एका भांड्यात काढून घ्या. उकडलेली अंडी समान समान भागामध्ये कापून अंड्यातील पिवळा भाग काढून टाका. 
  • उकडलेला बटाटा आणि अंड्यातील पिवळा भाग घ्या आणि आधीच शिजवलेल्या साहित्यात मिसळून त्यात कोथिंबीर आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मळून घ्या. 
  • त्याचे लहान गोळे बनवा. हे गोळे अंड्याच्या पांढऱ्या भागात ठेवा आणि त्याचे बॉल बनवून बंद करून घ्या. 
  • एका कढईत तेल तापत ठेवा. 
  • आता अंड्याचा कच्चा पिवळा भाग काढून त्यात हळद आणि लाल तिखट, मीठ घालून मिक्स करा. 
  • अंड्याचे बनवलेले गोळे या मिश्रणात बुडवा. नंतर ब्रेड, क्रम्ब्स मध्ये गुंडाळून हलक्या हातांनी गरम तेलात सोडा आणि हलक सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. 
                अशा प्रकारे गरमागरम चविष्ट अंड्याचे कटलेट तयार होतील. 

 

No comments:

Post a Comment