दुधीसारख्या नावडत्या आणि बेचव भाजीपासून बनवला जाणारा दुधी हलवा हा पदार्थ गोड पदार्थांपैकी सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट दिश मानली जाते. म्हणूनच दुधीची भाजी म्हटलं की नाक मुरडणारी ही मंडळी दुधीचा हलवा मात्र मिटक्या मारून खातात. जितका हा स्वादिष्ट आहे तितकाच ही डिश बनवण्यास सोपी मानली जाते. आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी व आवडत्या व्यक्तीला खाऊ घालून खुश करा.
दुधी हलवा बनवण्याचे साहित्य :-
- १ मोठ्या आकाराचा दुधी भोपळा
- १ कप दुध
- आवश्यकतेनुसार हिरवी वेलची
- ४ चमचे साखर
- ५ चमचे तूप
- आवश्यकतेनुसार बदाम
- आवश्यकतेनुसार काजू
- आवश्यकतेनुसार मनुका
- आवश्यकतेनुसार दुध पावडर
-
१ कप फुल क्रीम मिल्क
दुधी हलवा बनवण्याची कृती :-
- दुधी भोपळा मध्यभागी कापून त्याची साल काढून किसून घ्या. पुढे दुधी भोपळा किसताना त्याच्या बिया किसल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या.
- एका पॅॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यामध्ये बदाम, काजू आणि मनुका हलके परतून घ्या.
- त्याच पॅॅनमध्ये अजून साजूक तूप घ्यावे आणि किसलेला दुधी भोपळा त्या तुपात मऊशार होईपर्यंत परतून घ्या. पुढे मिश्रणात एक ग्लास दुध घालून ते आटेपर्यंत दुधीचा कीस ढवळत राहा. दुध आटल्यानंतर त्यामध्ये साखर घालून ती विरघळेपर्यंत संपूर्ण साहित्य २ ते ३ मिनिटे चांगली शिजवून घ्यावी.
- आता एका वेगळ्या पॅॅनमध्ये थोडं साजूक तूप घ्या आणि त्यात दुध घाला. दुध उकळू लागल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर घाला. आता दुधाला जाडसर मलाईसारखा लेअर येत नाही तोपर्यंत दुध आटू द्या. आपला इंनस्टंंट खवा आहे तयार !
- आता तयार झालेला खवा दुधी भोपळ्याच्या किसामध्ये घालून मिश्रण चांगलं मिक्स करा.. पुढे, दुधीच्या किसामध्ये परतलेले ड्राय फ्रुट घालून ते मिश्रणापासून वेगळे होत नाहीत तोपर्यंत शिजवा. आता त्यामध्ये वेलची पूड टाकून ती ह्लव्यात चांगली मिक्स करा.
तयार आहे आपला पौष्टिक आणि चविष्ट असा दुधी हलवा! तुमच्या आवडीनुसार थंड किंवा गरम पद्धतीत या हलव्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
No comments:
Post a Comment