भारतातील जेवणाची थाळी विविध प्रकारच्या चटण्यांशिवाय अपूर्ण आहे. जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी चटणी ही हवीच असते. भारतातील प्रत्येक भागांमध्ये विविध प्रकारच्या चटण्या प्रसिध्द आहेत.
तिळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- - तीळ
- शेंगदाणे
- लसणाच्या पाकळ्या
- जिरं
- मीठ
- लाल तिखट
तिळाच्या चटणी बनवायची कृती :- सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा त्यामध्ये एक कप तीळ घालून ते भाजून घ्या. तीळ भाजल्यानंतर एक प्लेटमध्ये ते तीळ काढून घ्या. त्याच कढईमध्ये एक कप शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घालून त्याला तपकिरी रंग येई पर्यंत भाजून घ्या. हे साहित्य भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, जिरे आणि लसणाच्या पाकळ्या घालून बारीक वाटून घ्या. मिश्रण वाटून झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ, मीठ, लाल तिखट घालून ते मिश्रण सर्व वाटून घ्या. त्यानंतर ही चटणी एक हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवा. अशा प्रकारे तिळाची खमंग चटकदार तिळाची चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे.
No comments:
Post a Comment