साहित्य :
- १ वाटी तेल
- पाणी २ वाट्या
- पापड खार २ छोटे चमचे
- साधे मीठ चवीप्रमाणे
कृती :
- एका पातेल्यात पाणी, पापडखार, थोडे मीठ हे मिसळून कोमट करून घ्या.
- या गरम गरम मिश्रणात मावेल तेवढेच नाचणीचे पीठ घालून ढवळून त्याचा गोळा करून घ्या.
- हा गोळा २ मिनिटे झाकून ठेवा, हे मिश्रण ताटात काढून तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या.
- या गोळ्याचे लहान लहान गोळे करून पोळपाटावर खाली प्लास्टिक पेपर पसरुन त्यावर गोळा ठेवून त्यावरही प्लास्टिक पेपर ठेवा व पातळ लाटा व स्वच्छ कापडावर उन्हाच्या धगीत परंतु सावलीत वाळवा,
- हे पापड २-३ दिवस वाळवून घ्या, नंतर पापड भाजून खाऊ शकता.
- अशा प्रकारे नाचणीचे पापड तयार होतील.
No comments:
Post a Comment