Saturday, April 29, 2023

नारळाची बर्फी



 
साहित्य : 

  • २ कप खोवलेला नारळ 
  • १ कप साखर 
  • ३ टेबलस्पून तूप 
  • १/२ चमचे वेलचीपूड 
  • १/२ कप दूध 

कृती : 

  • नारळ फोडून घ्या. नारळ खोवून चव काढून घ्या. साखर प्लेटमध्ये काढून घ्या. 
  • गॅॅसवर कढईत दोन टेबलस्पून तूप घालून त्यात नारळाचा चव घालून बारीक गॅॅसवर दोन तीन मिनिटे परतून घ्या. 
  • आता साखर व दूध घालून घ्या, वेलचीपूड घाला. 
  • मिडीयम टू लो गॅॅसवर हलवत रहा. साखर विरघळून मिश्रण पातळ होईल, हलवत रहा हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता एक टेबलस्पून तूप घाला व छान घट्ट गोळा झाला की 
  • बर्फी ट्रे ला किंवा प्लेटला तूप लावून घ्या व घट्ट झालेले मिश्रण ताटात काढून पसरून घ्या, वाटीला तूप लावून वाटीने च थापून घ्या, वरून ड्रायफ्रुट्स भुरभुरावे व थोडे प्रेस करा. 
  • पाच मिनिटांनी काप करून घ्यावेत व पूर्ण थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. 
  • अशा प्रकारे नारळाची चवदार बर्फी तयार होईल. 

No comments:

Post a Comment