आज आपण सफरचंदापासून हलवा बनवणार आहोत. चला तर मग बघूया या पदार्थाची साहित्य आणि कृती.
साहित्य :-
- ५ सफरचंद
- ४ चमचे तूप ( आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता )
- पाऊण वाटी साखर
- वेलची पूड
- साय
- काजू, बदाम
- सफरचंद धुवून, त्याचे २ काप करून त्यामधल्या बी काढून कीस करून घ्या.
- कढईमध्ये तूप घ्या.
- तूप गरम होत आले की, काजू, बदाम तुपावर २ मी. परतून घ्या.
- आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून, सफरचंदातील पाणी कमी होईपर्यंत छान परतून घ्या.
- १५ मिनिटे झाल्यावर त्यामध्ये साखर, वेलची पूड घालून ते एकत्र करून घ्या.
- एक सारख मध्यम आचेवर हलवत राहायचं आहे.
- २ मिनिटांनी साय घालून एकत्र करून घ्या.
- मिश्रण जाडसर होईपर्यंत आणि कढईपासून वेगळे झाले की, आपला सफरचंदाचा हलवा तयार आहे.

No comments:
Post a Comment