Friday, April 28, 2023

अगदी सोप्या पद्धतीने करा कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी!


            चटपटीत, मसाला घालून केलेली 'कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी' तोंडाला चवच आणेल. 



'कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी' करण्यासाठी साहित्य :- 

१) १ किलो कॉलीफ्लॉवर 

२) १ वाटी धणे 

३) अर्धा चमचा हळद 

४) १ चमचा तिखट 

५) १० लसूण पाकळ्या 

६) ५ चमचे तेल 

७) अर्धा चमचा मोहरी 

८) १ चमचा मीठ (चवीनुसार). 


'कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी' करण्यासाठी कृती :- 

१) फ्लॉवर नीट करून बारीक चिरावा किंवा आवडीनुसार तुरे ठेवावे. 

२) धुवून पंधरा मिनिटे पाव चमचा हळद घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावा. नंतर चाळणीवर निथळत ठेवून पुन्हा त्यावर साधे पाणी घालावे. एकीकडे लसूण, धणे, हळद व तिखट कच्चेच पाट्यावर वाटून घ्यावे. 

३) एका भांड्यात तेल तापले की त्यत मोहरी घालावी. मोहरी तडतडली की वाटलेला मसाला टाकून खमंग परतावा. 

४) खाली उतरवून त्यात कॉलीफ्लॉवर घालावा व अलगद ढवळावे. 

५) थोडा पाण्याचा शिपका देऊन पाण्याचे झाकण ठेवावे व मंद विस्तवावर भाजी ठेवावी. 

६) दहा मिनिटानंतर मीठ व वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी पूर्ण शिजवावी. 

       अशा प्रकारे चमचमीत व चविष्ट कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी तयार आहे. 

 

No comments:

Post a Comment