Friday, April 28, 2023

रवा लाडू


साहित्य : 

  • ३ कप बारीक रवा 
  • १.५ कप साखर 
  • १/२ कप पाणी 
  • १/४ कप सुक्या नारळाचा खीस 
  • १/४ कप तूप 
  • १/२ टेबलस्पून वेलची पूड 
  • चिमुटभर मीठ 
  • सुकामेवा घालू शकता
कृती : 

  • सर्व साहित्य घ्या आणि रवा छान साफ असावा. 
  • सुक्या नारळाच खोबर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. 
  • कढईमध्ये तूप टाकून रवा छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. 
  • २ मिनिटाने सुक्या नारळाचा खीस व सुकामेवा घालून रव्या सोबत भाजून घ्या. 
  • रवा बाजूला काढून आता कढईमध्ये साखर आणि पाणी घालून मंद आचेवर साखर विरघळून घ्या. 
  • साखर विरघळल्या नंतर या मिश्रणात मीठ आणि वेलची घाला हे सर्व कोमट झाल्यानंतरच रवा मिक्स करून ३० मिनिटे झाकून ठेवा. (साखरेचे मिश्रण गरम असताना घालू नये) 
  • ३० मिनिटाने सर्व छान मिक्स करून लाडू बनवून घ्यावे. 
  • एवढ्या प्रमाणात १२ लाडू तयार होतात. २० दिवस टिकू शकतात. 
  • अशा प्रकारे रव्याचे लाडू तयार होतील. 

No comments:

Post a Comment