Saturday, April 29, 2023

ज्वारीचे डोसे


ज्वारीचा हा सोप्पा पदार्थ...लहान मोठ्यांना खायला नक्कीच आवडेल. आपण आज ज्वारीचे डोसे कसे बनवायचे ते पाहूया.
 

साहित्य :- 

  • ज्वारीचे पीठ एक वाटी 
  • तांदुळाचे पीठ अर्धी वाटी 
  • एक मोठा कांदा 
  • दोन हिरव्या मिरच्या 
  • चवीपुरते मीठ 
  • हिंग 
  • हळद 
  • तेल
     
कृती :- 

  • कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरचीचे बारीक तुकडे करावे.
  • ज्वारीचे पीठ तांदुळाचे पीठ ,कांदा, मिरची, हळद. हिंग हे सर्व एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालत जावे.
  • हे मिश्रण जास्ती जाड असू नये. तांदळाचे घावणे करण्यासाठी जेवढी पातळ करतो त्याप्रमाणे करावे. 
  • मिश्रणात १ चमचाभर तेल घालावे. 
  • दहा मिनिटे झाकून ठेवावे. 
  • फ्राय पॅॅन गरम करून घ्यावा आणि त्यावर पळीने पातळ डोसे घालावे. दोन्ही बाजूनी शेकवून घ्यावे. 
  • चटणी सॉस किंवा दही साखर या बरोबर सर्व्ह करावे. 
  • वर दिलेल्या साहित्यात पाच ते सहा डोसे होतात. 

No comments:

Post a Comment