साहित्य :
- १ कप बारीक रवा
- तूप/ तेल
- शेंगदाणे
- मोहरी, जिरे, हिंग
- बारीक चिरलेला कांदा
- १-२ हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता
- पाणी
- चवीनुसार मीठ
- साखर
- बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
- कढई गरम करून तूप/तेल घाला आणि त्या मध्ये रवा चांगला मिसळा रवा सुमारे ६-७ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.
- कढई मध्यम आचेवर गरम करा त्यामध्ये तेल टाका.
- मोहरी, जिरे, हिंग, कांदा घाला चांगले मिक्स करावे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता घाला
- चांगले मिसळा आणि ५-६ मिनिटे शिजवा कांदा मऊ होई पर्यंत शिजवा.
- भाजलेला रवा घालून मिक्स करावे व त्यात हळूहळू गरम पाणी मीठ आणि साखर घाला.
- चांगले मिक्स करावे आणि गॅॅस कमी करा.
- आपण आपल्या चवीनुसार पाण्याचे प्रमाण बदलू शकता.
- मध्यम आचेवर १/ मिनिटे झाकून ठेवा आणि शिजवा.
- शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ताजे किसलेले खोबरे घाला.
- अशा प्रकारे गरमागरम स्वादिष्ट उपमा तयार होईल.
No comments:
Post a Comment