Saturday, April 29, 2023

पौष्टिक मेथीचे लाडू


 


साहित्य : 

  • १/४ कप मेथीदाणे 
  • १ कप तूप ....आवश्यकतेनुसार कमी जास्त 
  • १ कप गव्हाचे पीठ 
  • १/४ कप डिंक 
  • १/४ कप खारीक पावडर 
  • १/४ कप ड्रायफ्रुट्स चे तुकडे 
  • १/२ कप गूळ 
  • ४ टेबलस्पून खसखस 
  • १/४ कप किसलेले खोबरे 
कृती : 

  • सर्व साहित्य घ्या. 
  • मेथीदाणे भाजून त्याची पूड करून तुपात रात्रभर भिजत ठेवली. 
  • डिंक तळून घेतला, कुस्करून घेतला खसखस परतून घ्या. 
  • ड्रायफ्रुट्स थोड्या तुपाच परतलेले, खोबर किसून परतून घेतल. गव्हाचे पीठ छान खमंग परतले. 
  • थोडे थोडे तूप घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतले. त्यात खारीक [पावडर घालून परतले. 
  • गूळ वितळवून घेतला, खसखस, खोबर, ड्रायफ्रुट्स मिक्सर मधु बारीक केले. सगळे मिश्रण एकत्र करून आवश्यकतेनुसार तूप घालून छान मिक्स केले. 
  • सगळ मिश्रण एकत्र करून त्याचे छान लाडू वळून घेतले. 
  • अशा प्रकारे मेथीचे पौष्टिक लाडू तयार होतील. 

No comments:

Post a Comment