Saturday, April 29, 2023

आंब्याची कढी


 

आपण आज बघूया आंब्याची कढी बनवण्याचे साहित्य आणि कृती.

साहित्य :-
 

  • एक खवलेला नारळ 
  • एक मध्यम कैरी उकडलेली 
  • गुळ, मीठ 
  • फोडणीसाठी अर्धा टीस्पून तेल, 
  • अर्धा चमचा मेथीचे दाणे 
  • ४ सुक्या मिरच्ा
     
कृती :- 

  • कैरी उकडून तिचा गर काढून घ्यावा. 
  • नारळाचं दुध काढून घ्यावं ( आवडेल तितक पातळ ) 
  • नारळाच्या दुधात गुळ विरघळून घ्यावा. 
  • कैरीचा गर थोडा थोडा करून नारळाच्या दुधात मिळावा. कैरीच्या आंबटपणावर किती गर लागेल ते अवलंबून असतं. सगळा गर लागेलच असंही नाही. 
  • चवीप्रमाणे मीठ घालून कढी उकळण्यास ठेवावी. 
  • फक्त अर्धा चमचा तेल घेऊन फोडणीसाठी तापत ठेवाव. तेल तापलं की, त्यात मेथीचे दाणे घालावेत आणि सुक्या मिरच्यांचे तुकडे घालून चमच्याने फोडणी जरा परतवून मगच कढीत घालावी. 

No comments:

Post a Comment