साहित्य :
- २ मोठया काकड्या
- १/२ चमचे हिरवी मिरची पेस्ट
- २ चिमटी मिरपूड
- २ चमचे ऑलिव ऑईल
- १/४ कप कांदा, बारीक चिरून
- २ लसणीच्या पाकळ्या
- १ चमचा लिंबाचा रस
- चवीपुरते मीठ
- कोथिंबीर
कृती :
- काकड्या सोलून घ्याव्यात, देठ काढून पातळ गोल चकत्या कराव्यात. दोन्ही काकड्यांची चव पहावी कारण कधीकधी काकडी कडवट असते.
- पातेल्यात तेल गरम करावे. त्यात लसूण परतावी. नंतर कांदा परतावा.
- कांदा नीट शिजला की काकडीच्या चकत्या आणि थोडे मीठ घालावे.
- मिडीयम आणि लो च्या मध्ये आच ठेवावी. झाकण ठेवून १० मिनिटे काकडी शिजू द्यावी. १० मिनिटांनी ककडी एकदम मऊ झालेली असेल.
- हे मिश्रण मिक्सरमध्ये घालावे. मिरची पेस्ट, लिंबू रस आणि मिरपूड घालून एकदम बारीक करावे, कन्सिस्टन्सी अॅॅडजस्ट करावी लागली तरच २-३ चमचे पाणी घालावे.
- सूप कोमटसर सर्व्ह करावे किंवा २ तास फ्रीजमध्ये ठेऊन कोल्ड सूप म्हणून सर्व्ह करू शकता.
- अशा प्रकारे स्वादिष्ट काकडीचे सूप तयार होईल.
No comments:
Post a Comment