Saturday, April 29, 2023

आवळा कँडी


 

आज आपण लहान मुलांना आवडणारी आवळा कँँडी बनवणार आहोत.
 

साहित्य :- 

  • आवळे 
  • साखर 
  • पाणी 
  • पिठीसाखर
     
कृती :- 

  • आवळे धुवून पुसून कोरडे करून घ्यावे. 
  • प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून डिप फ्रीजरमध्ये २ दिवस ठेवावे. २ दिवसांनी बाहेर काढून ठेवावे thawing होऊ द्यावे. 
  • thawing झाल्यावर त्यातील बिया काढून पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. ( सहज करता येतात ).
  • साखरेचा पक्का पाक करावा आणि गार होऊ द्यावा, आवळ्याच्या पाकळ्या पाकात ३ दिवस मुरवत ठेवाव्यात, सगळ्या पाकळ्या बुडतील एवढा पाक असावा, रोज आवळ्याचा रस निघेल तो काढून टाकावा, पूर्ण पाक काढू नये, ( या रसाचे सरबत करता येते. ) 
  • तीन दिवसांनी आवळे साधारण कोरडे वाटतील. एका ताटात पिठीसाखर घ्यावी. आवळ्याची १-१ पाकळी त्यात घोळवून एखादा जाड प्लास्टिकच्या कागदावर काढून ठेवावे. 
  • ७-८ तास सावलीतच वाळू द्यावे. 
  • आवळा कँँडी तयार. 

No comments:

Post a Comment