Saturday, April 29, 2023

छोले मसाला भाजी


 

साहित्य : 

  • १ वाटी छोले 
  • १ बटाटा 
  • १ कांदा 
  • १ टोमॅॅटो 
  • २ तमालपत्र 
  • ४ काळी मिरी 
  • १ चक्र फुल 
  • ५-६  कढीपत्ता पाने 
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट 
  • २ टेबलस्पून तेल 
  • १ चमचा जिरे 
  • १ चमचा मोहरी 
  • १ टेबलस्पून लाल तिखट 
  • १ टेबलस्पून छोले मसाला 
  • १.५ चमचा गरम मसाला 
  • १.५ चमचा धने पावडर 
  • १.५ चमचा कांदा-लसूण मसाला 
  • २ चमचे हळद 
  • चवीनुसार मीठ , गरजेनुसार पाणी 

कृती : 

  • प्रथम छोले स्वच्छ धुऊन सात तास भिजवून ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून टाकून स्वच्छ धुवून घ्या. आणि त्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. एक बटाटा सुद्धा उकडून घ्या. 
  • आता कांदा टोमॅॅटो कट करून घ्या, आले-लसूण पेस्ट तयार करून घ्या. 
  • आता पॅॅनमध्ये तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे. मोहरी, कढीपत्ता , आणि सर्व खडे मसाले घालून फोडणी तयार करून घ्या. 
  • यामध्ये कांदा, आले -लसूण पेस्ट, आणि हळद टाकून कांदा परतून घ्या. 
  • कांदा परतल्यानंतर यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, छोले मसाला , धने पावडर, कांदा लसूण मसाला घालुन सर्व मिक्स करून घ्या. 
  • यामध्ये टोमॅॅटो घाला चिमुटभर साखर घाला दोन टेबलस्पून पाणी घाला. दहा मिनिटे झाकून मसाला छान परतून घ्या. 
  • मसाल्याचा छान तेल सुटलेले दिसेल आता यामध्ये उकडलेल्या बटाटा स्मॅॅश करून  घाला 
  • आणि नंतर शिवलेले छोले घाला छान सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ घाला. गरजेनुसार पाणी घाला आणि १५ मिनिटे झाकून मस्त उकळी आणा 
  • वरून कोथिंबीर टाकून घ्या. 
              अशा प्रकारे चमचमीत छोले मसाला भाजी तयार होईल. पोळीबरोबर सर्व्ह करू शकता. 

No comments:

Post a Comment