Saturday, April 29, 2023

पपईचे धपाटे


 

आज आपण पपईपासून एक नवीन पदार्थ याची साहित्य आणि रेसिपी बघूया. 

साहित्य :-
 

  • चांगल्या पिकलेल्या, गोड असलेल्या पपईचे तुकडे २ मोठ्या वाट्या 
  • पाच सहा भाकरी होतील एवढे ज्वारीचे पीठ 
  • २  चमचे डाळीचे पीठ 
  • १ चमचा ओव्याची पूड 
  • २-३ चमचे तीळ 
  • १-२ चमचे धने जिरे पूड 
  • हव्या त्या प्रमाणात तिखट 
  • मीठ 
  • हळद 
  • आवडत असल्यास बारीक चिरून कोथिंबीर
     
कृती :- 

  • पपईच्या तुकड्यांचा मिक्सरमध्ये रस करून घ्या. 
  • ज्वारीच्या पिठात सर्व जिन्नस मिसळून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून घ्या. भिजवताना अजिबात पाणी घालायचे नाही. 
  • भाकरीसारखेच पिठावर थापून घ्या. 
  • भाजताना तव्यावर पीठ लावलेली बाजू येईल अशा पद्धतीने टाका.
  • दोन्ही बाजून तेलान हात लावून भाजून घ्या,
  • खाताना बरोबर तूप, लोणी किंवा दही, ताक-दुध, दही-दुध घ्या. 
  • मिरचीचा ठेचा किंवा दाण्याची चटणी,जवसाची चटणी वैगेरे बरोबर मस्त लागतो. 

No comments:

Post a Comment