साहित्य :
- १ कप पोहे
- १ कप रवा
- १ कप दही
- ३-४ हिरव्या मिरच्या
- २ टेबलस्पून कोथिंबीर
- ५-६ कढीपत्त्याची पाने
- १ इंच आले
- १ टेबलस्पून मीठ
- १ लहान पॅॅकेट इनो
- २ टेबलस्पून तेल
- १ टेबलस्पून तेल
- १/२ टेबलस्पून हिंग
कृती :
- पोहे मिक्सर मध्ये फिरवून त्याचे बारीक पीठ तयार करून घ्यावे.
- बारीक केलेले पोह्याचे पीठ रवा आणि दही मिक्स करून घ्यावे.
- मिक्स केलेले मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
- नंतर त्यात मिरची घालून मिश्रण फेटून घ्यावे.
- प्लेटला तेल लावून त्यात फेटलेले मिश्रण घालून वरून चिली फ्लॅॅक्स, ओरिगनो, मिरी पावडर वेगवेगळ्या प्लेट मध्ये वरून भुरभुरावे.
- उकड पात्रात पाणी घालून गरम करून प्लेटमध्ये भरलेले मिश्रण पंधरा मिनिटे शिजवून घ्यावे.
- गॅॅसवर फोडणी पात्रात तेल घालून त्यात राई, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी तयार करून शिजवलेल्या ढोकळ्यावर ओतावी.
- नंतर आवडतील त्या आकारात सुरीने ढोकळा कापून वरून कोथिंबीर घालावी.
- अशा प्रकारे मऊ लुसलुशीत पोहा ढोकळा तयार होईल.
No comments:
Post a Comment