Friday, April 28, 2023

अंडा पराठा


 

साहित्य : 

  • २ वाट्या कणीक 
  • मीठ 
  • ४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा 
  • ३-४ अंडी 
  • १ कांदा 
  • ४-५ हिरव्या मिरच्या 
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • १/२ चमचा गरम मसाला 
  • मीठ
     
कृती : 

  • अंडी फोडून घ्यावीत. 
  • थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, गरम मसाला घालून हलवावे. 
  • अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. 
  • कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे. 
  • कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १/२ तास पीठ झाकून ठेवावे. 
  • नंतर त्याच्या दोन पुऱ्या लाटून घ्याव्यात
  • एकावर वरील अंड्याचे मिश्रण थोडे पसरून त्यावर दुसरी पुरी ठेवावी. 
  • कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे. 
  • नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे. 
  • अशा प्रकारे गरमागरम अंडा पराठा तयार होईल . सॉस सोबत सर्व्ह करावा. 

No comments:

Post a Comment