Friday, April 28, 2023

रुचकर कांदे पोहे


 साहित्य :-   १)४ मुठी जाडे पोहे २)१ कप बारीक चिरलेला कांदा ३)१/४ कप शेंगदाने  ४)२ हिरव्या मिरच्या ५) १/४ चमचा हळद ६) १/४ चमचे मोहरी ७) १/४ चमचे हिंग ८) ३-४ कढीपत्ता ९) १ टेबलस्पून ओल खोबरं १०) १/४ चमचा साखर ११) १ टेबलस्पून कोथिंबीर १२) २ चमचे लिंबूरस १३) मीठ चवीप्रमाणे 

कृती :- 

  1. जाडे पोहे साध्या पाण्याने २ वेळा धुवून घ्या. पाणी पूर्ण गाळून टाका.
  2. पोहे चांगले भिजल्या नंतर पोह्यांमध्ये हळद , मीठ साखर टाका.
  3. कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिरवी मिरची,कढीपत्ता, हिंग घाला 
  4. नंतर कांदा घालून २ मिनिट परतून त्यात मटार घालून झाकण ठेवा.
  5. कांदा शेंगदाणे शिजली की त्यात भिजवलेले पोहे घालावेत. आणि ते मिक्स करावे. तेल आणि परतलेला कांदा सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी.मध्यम आचेवर वाफ काढावी. 
  6. चवीनुसार मीठ घालावे .लिंबू रस मिक्स करा. 
  7. नंतर ओल खोबर आणि कोथिंबीर घालावी. 
               अशा प्रकारे गरमा गरम पोहे तयार आहेत.

No comments:

Post a Comment