Saturday, April 29, 2023

सुके बोंबील फ्राय


 

आज आपण सुके बोंबील फ्राय या पदार्थाबद्दल जाणून घेऊ. साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे आहे.
 

साहित्य :- 

  • सुके बोंबील- १०-१२ 
  • लाल मिरच्या- ७-८ 
  • कांदा-१ 
  • लसूण पाकळ्या- १०-१२ 
  • आलं- १ छोटा तुकडा 
  • जीरा- १ चमचा 
  • मीठ- चवीनुसार 
  • साखर- १ चमचा 
  • पाणी- १/४ कप/ गरजेनुसार 
  • तेल- २ चमचे / गरजेनुसार
     
कृती :- 

  • सुके बोंबील नेहमीप्रमाणे साफ करून घ्या. त्याचे डोके, शेपूट कापून टाका व धुवून घ्या. तुकडे करू नका. तप पूर्ण फ्राय करायचा आहे. 
  • मिक्सरमध्ये कांदा, लाल मिरच्या, लसूण, आलं, साखर, मीठ, जीरा, जाडसर वाटून घ्या. आवश्यक तेवढेच पाणी टाका. पातळ करू नका. 
  • नंतर बोंबीलला वरील वाटप लावून घ्या.
  • गॅसवर पॅॅन ठेवून तेल टाका. नंतर त्यात बोंबील टाका. 
  • नंतर १/४ कप किंवा बोंबील बुडतील एवढ पाणी टाका. 
  • झाकण ठेवून बोंबील शिजू द्या. पाणी सुकल म्हणजे बोंबील शिजले का ते पहा. आवश्यक वाटल्यास किंचित पाणी टाका. 
  • पाणी सुकले की बोंबील फ्राय तयार आहेत. 
  • गरमागरम चपाती / भाकरीसोबत सर्व्ह करा.  

No comments:

Post a Comment