Saturday, April 29, 2023

कच्च्या केळ्याचे पॅॅटीस


 

कच्च्या केळ्याचे पॅॅॅॅटीससाठी लागणारे साहित्य :-
 

  • अर्धा किलो कच्ची केळी 
  • रवा १ वाटी 
  • तिखट मीठ चवीनुसार 
  • ८-१० लसूण पाकळ्या 
  • आल्याचा तुकडा 
  • ४-५ हिरवी मिरची 
  • तेल 
कृती :-
 

  • कच्ची केळी साली सहित कुकरवर शिजवून घ्यावी. शिजवताना पाणी जास्त घालू नये. ४-५ शिट्या पुरे आहेत. 
  • कुकर थंड झाल्यावर, केळीची साले सुटतात. त्यातला गर काढून, कुस्करून लगदा करून घ्यावा. 
  • त्यात मीठ, आले लसूण मिरची पेस्ट, असे मिक्स करून घ्यावी. 
  • याचे लहान पॅॅॅटीस तयार करून घ्यावे. 
  • एका प्लेट मध्ये कोरडा रवा, त्यात मीठ न जरासे तिखट असे मिक्स करावे. 
  • पॅॅटीस दोन्ही बाजूंनी हे मिश्रण लावून घ्यावे.
  • फ्राइंंग पॅॅनमध्ये दोन्ही बाजूनी खमंग शॅॅलो फ्राय करून घ्यावे. 
  • चती / दही / सॉस सोबत गरम सर्व्ह करावे. 

No comments:

Post a Comment