साहित्य :
- २ कच्ची केळी
- १ चमचा तिखट
- १/४ चमचे हळद
- १/२ चमचे गरम मसाला
- १ चमचा आमचूर पावडर
- १/२ चमचे मीठ ...चवीनुसार
- २ चमचे रवा
कृती :
- दोन कच्ची केळी घेतली. त्याचे साल काढून उभे काप केले आणि ते मिठाच्या पाण्यात १० मिनिटे ठेवले.
- काप पाण्यातून काढून नीट पुसून घेतले.
- बाकी सर्व मसाले, मीठ घेऊन नीट मिक्स केले. त्यात रवा मिसळला सर्व काप मसाल्यात छान घोळावून घेतले.
- तव्यावर तेल सोडून त्यात हे काप शॅॅलो फ्राय करून घेतले.
- चांगले फ्राय करून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घेतले.
- अशा प्रकारे कच्चा केळ्याची काप तयार होतील.
No comments:
Post a Comment