Saturday, April 29, 2023

नारळाची मिठाई


 

नारळापासून मिठाई कशी बनवतात ते आपण आज पाहणार आहोत.
 

साहित्य :- 

  • एक नारळ 
  • २०० ग्रॅम खवा 
  • २०० ग्रॅम साखर 
  • सुकामेवा- काजू 
  • बदामाचे काप 
  • बेदाणे 
  • २ चमचे तूप 
कृती :-
 

  • नारळ खवून घ्या. 
  • खवा जाड बुडाच्या भांड्यात २ चमचे तुपावर भाजा, पण रंग बदलू देऊ नका किवा खाली लागू देऊ नका.
  • नारळ आणि साखर एकत्र करून गॅसवर ठेवा, सतत ढवळा. 
  • साखर विरघळून मिश्रण थोडे घट्टसर झाले, की खवा मिसळा. 
  • खवा मिसळला की, मिश्रण पातळ होईल. ते घट्ट होईपर्यंत आवळत रहा. 
  • कोमट झाले की, हव्या त्या आकाराची मिठाई करा/ लाडू वळा. 
  • वरून सुकामेवा लावा. 
  • अशाप्रकारे तयार आहे नारळाची स्वादिष्ट मिठाई.  

No comments:

Post a Comment