Thursday, April 27, 2023

साऊथ इंडियन कुरकुरीत डाळ वडा बनवा घरच्या घरी


 


डाळ वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • १ कप चणा डाळ 
  • लाल-हिरवी मिरची
  • जिरं
  • बडीशेप 
  • बारीक चिरलेला कांदा 
  • बारीक चिरलेला कडीपत्ता 
  • आलं-लसूण पेस्ट 
  • मीठ 
  • तेल. 

डाळ वडा बनवण्याची कृती :-
सर्वात आधी एका भांड्यामध्ये एक कप चणा डाळ घ्या. त्यामध्ये पाणी घालून ती डाळ रात्रभर किंवा ८ तासांसाठी भिजत ठेवा. डाळी भिजल्यानंतर त्या डाळींमधील अतिरिक्त पाणी काढून घ्या. त्यानंतर ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्यामध्ये लाल-हिरवी मिरची, जिरं, बडीशेप घालून मिश्रण जाडसर वाटून घ्यावे. मिश्रण वाटून झाल्यानंतर त्यामध्ये एक कप भिजलेली चणाडाळ, बारीक चिरलेला कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, मीठ घालून सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्या. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याला छोटे-छोटे वाड्यांचा आकार द्या. दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि या तेलामध्ये तयार केलेले डाळीचे वडे तळून घ्या. 

         अशा प्रकारे कुरकुरीत डाळ वडा खाण्यासाठी तयार झाला आहे.   

No comments:

Post a Comment