Saturday, April 29, 2023

टोमॅॅटो डोसा


साहित्य : 

  • अर्धी वाटी उडीद डाळ 
  • दोन वाट्या तांदूळ 
  • दोन मोठे घट्ट टोमॅॅटो 
  • लाल सुक्या मिरचीचा चुरा 
  • एक चमचा जीर
  • चवीनुसार मीठ 

कृती : 

  • डाळ आणि तांदूळ दोन्ही किमान सात ते आठ तास एकत्र भिजत घालाव. 
  • गुळगुळीत वाटून घ्यावं. इडलीच्या पीठापेक्षा हे पीठ थोडं पातळ असलं तरी चालेल. 
  • सकाळी डोसे करायच्या वेळी टोमॅॅटो किसून घ्या. पिठात टोमॅॅटो, जीर आणि मिरचीचा चुरा घालून डोसे करावे. 
  • थोडं मीठ घालून, झाकून उबदार जागी फुगत ठेवावं, सकाळी पीठ फुगल की चांगलं ढवळून घ्यावं. 
  • डोसा करतेवेळी पीठ पाळीनंं घोटून घ्यायचं. गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं. एका वाटीत तेल आणि दुसऱ्या वाटीत पाणी तयार ठेवायचं. 
  • बीडचा तवा असेल तर तो तापल्यावर पेपर नैपकीनला तेल लावून तवा पुसून घ्यायचा. मग तवा पुरेसा तापला, की नाही हे बघण्यासाठी त्यावर पाणी शिंपडावे. गॅॅस मात्र मोठाच हवा. 
  • पाणी झटकन वाफ होऊन नाहीसे झालं, की एक डावभर पीठ मध्यभागी ओतायचं. 
  • बाजून तेल सोडायचं, डोसा कुरकुरीत होतो. दुसऱ्या बाजूने करायची गरज नाही, त्यानंतर प्रत्येक वेळी पाणी शिंपडायचे, पाणी नाहीसे झाले की पीठ पसरायचे आणि तेल सोडावे. 
  • अशा प्रकारे कुरकुरीत टोमॅॅटो डोसा तयार होतील. 

No comments:

Post a Comment