Friday, April 28, 2023

चमचमीत आणि मस्तच दही मिसळ



 

'दही मिसळ' साठी लागणारा साहित्य :- 

  • ५०० ग्रॅॅम मटकी 
  • ७-८ हिरव्या मिरच्या 
  • १/२ नारळ 
  • लिंबाएवढा गूळ 
  • मीठ
  • २ मोठे बारीक चिरलेले कांदे 
  • २ मोठे उकडलेले चौकोनी तुकडे करून बटाटे 
  • १०० ग्रॅॅम बारीक शेव 
  • १०० ग्रॅॅम चिवडा 
  • २ वाट्या दही. 

'दही मिसळ' करण्याची कृती :- 

  • आदल्या दिवशी मटकी भिजत घालावी. तिला मोड आल्यावर मटकी निवडून घ्यावी. 
  • तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. त्यात मोड आलेली मटकी घालावी. 
  • जरा परतून थोडे पाणी घालावे व मटकी शिजू द्यावी. 
  • मटकी शिजल्यावर त्यात वाटलेल्या मिरच्या, गूळ व मीठ घालून उसळ बनवावी. 
  • कोथिंबीर व नारळ घालून उसळ खाली उतरवावी. 
  • उसळीत पाणी अजिबात राहता नये. उसळ गार होऊ द्यावी. 
  • आयत्या वेळी प्लेटमध्ये २ डाव उसळ घालावी.
  •  उसळवर थोडा बारीक चिरलेला कांदा घालावा. बटाट्याच्या फोडी घालाव्यात. 
  • नंतर त्यावर चिवडा  व बारीक शेव घालावे.
  • वरती १ चमचा गोड व घट्ट दही घालावे व बटर लावून भाजलेल्या पावाबरोबर सर्व्ह करावे. 


No comments:

Post a Comment