Saturday, April 29, 2023

तवशाचे लोणचे


 

आज आपण तवशापासून लोणचे तयार कसे ते पाहूया.
 

साहित्य :- 

  • तवशाचे तुकडे २ वाट्या 
  • लाल मोहरीची पूड २-३ चमचे 
  • उकळून गार केलेलं पाणी - अर्धी ते पाऊण वाटी 
  • पोपटी मिरच्यांची भरड १ टीस्पून 
  • मीठ चवीनुसार 
  • फोडणी :- तेल- ४-५ टीस्पून, मोहरी, हिंग, हळद 
कृती :-
 

  • तवशाची साल आणि बिया काढून त्याचे १ से. मी. चे क्युब्स करावे. 
  • पोपटी मिरच्या भरड वाटाव्यात. दगडी खलबत्यात वाटल्यास मिरचीहून हिरवे, नाहीतर मिक्सर आहेच. 
  • मोहरीची बारीक पूड पाण्यात घालून फेटून घ्यावी. 
  • त्यातच मीठ घालून घ्यावे. 
  • हे पाणी, तवशाचे तुकडे, मिरचीचा ठेचा एकत्र करून चांगले ढवळावे. 
  • गार झालेली फोडणी घालावी. 

No comments:

Post a Comment