Saturday, April 29, 2023

चविष्ट आणि कुरकुरीत पोहा डोसा


साहित्य : 

  • १ वाटी पोहे 
  • २ चमचे दही 
  • १ बारीक चिरलेली सिमला मिरची 
  • १ बारीक चिरलेला कांदा 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • १ चमचा खाण्याचा सोडा 
  • १ चमचा सांबार मसाला 
  • तेल 
  • पाणी आणि चवीनुसार मीठ 

कृती : 

  • पोहे मसाला डोसा बनवण्यासाठी प्रथम पोहे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. 
  • आता त्यात दही आणि थोडे पाणी घाला. पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या मिश्रणात बेकिंग सोडा आणि थोडे मीठ घालून मिक्स करा. डोसा पीठ तयार होईल 
  • आता गॅॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवा. यानंतर तव्यावर हलके पाणी शिंपडा स्वच्छ कापडाने पुसून टाका. 
  • आता डोसा पीठ तव्यावर ओता आणि गोलाकार हालचालीत पसरवा. यानंतर गॅॅस मध्यम आचेवर ठेवा. 
  • नंतर डोस्यावर सांबार मसाला स्प्रे करा. आता त्यावर सिमला मिरची, कांदा आणि हिरवी कोथिंबीर टाका. 
  • लक्षात ठेवा की सर्व भाज्या डोस्यावर पूर्णपणे पसरल्या पाहिजेत. दुसरीकडे आपण आपल्या आवडत्या भाज्या कापून डोस्यावर देखील ठेऊ शकता. 
  • यानंतर डोस्यावर मीठ टाकून चारी बाजूने तेल टाकून सोडवण्याचा प्रयत्न करा. 
  • अशा प्रकारे चविष्ट कुरकुरीत डोसा तयार होईल. 

No comments:

Post a Comment