Saturday, April 29, 2023

दुधी भोपळ्याचे थालीपीठ


 

साहित्य :-
 

  • १ मध्यम आकाराच्या दुधी भोपळा 
  • १ मध्यम कांदा किसून 
  • १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • १ वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने 
  • १ वाटी नाचणीचे पीठ 
  • २ वाट्या गव्हाचे पीठ 
  • १ चमचा तिखट 
  • हळद 
  • हिंग 
  • १/२ चमचा ओवा 
  • १ चमचा धने पावडर 
  • तेल आणि चवीनुसार मीठ 
कृती :-
 

  • दुधी भोपळा किसून घ्यावा. ( पिळून पाणी काढू नये ) 
  • त्यात किसलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मेथी तिखट, धणे पावडर, हळद, हिंग, ओवा, मीठ, नाचणीचे पीठ आणि गव्हाचे पीठ घालावे. 
  • पाणी न टाकता,  छान मळून घ्यावे. किसलेल्या दुधी व कांद्यामुळे पाणी सुटते म्हणून वेगळे पाणी घालावे लागत नाही. तरीही पीठ सैलसर होते. थापायचे असल्याने सैल असले तरी चालते. 
  • पोळपाटावर एक स्वच्छ रुमाल, ओळ करून पसरवून ठेवावा. त्यावर तयार पिठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन थापून घ्यावा, 
  • रुमाल अलगद उचलून, गरम तव्यावर पालथा करावा. थालीपीठ तव्यावर टाकून, रुमाल अलगद काढून घ्यावा. 
  • मंद गॅसवर दोन्ही बाजू तेल लावून,छान भाजून घ्यावा. स्वादिष्ट थालीपीठ तयार... 
  • लोणचे किंवा चटणीसोबत सर्व्ह करावे.  

No comments:

Post a Comment