'गुलाबाचे सरबत' हे उष्णता आणि थकवा घालविणारे शरीरात थंडावा ठेवणारे उन्हाळ्यामध्ये याचा अवश्य उपयोग होईल.
'गुलाबाच्या सरबता' साठी लागणारे साहित्य :-
- १ किलो साखर
- ४०० मिली. पाणी
- १/२ लहान चमचा सायट्रिक अॅॅसिड
- १/४ लहान चमचा रासबेरी रेड रंग
- १/२ चमचा रोझ इसेंस.
- प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी टाकून त्यात १/२ चमचा सायट्रिक अॅॅसिड घालावे.
- सर्व एकत्र करून गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवावे.
- गार झाल्यावर त्यात रासबेरी रेड रंग व रोझ इसेंस टाकून गाळून हे लिक्विड बाटलीत भरावे.
- सरबत देताना पाव भाग तयार केलेले लिक्विड आणि पाऊण भाग थंड पाणी किंवा थंड दूध घालून सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment