Showing posts with label नाश्ता रेसिपी. Show all posts
Showing posts with label नाश्ता रेसिपी. Show all posts

Wednesday, May 17, 2023

बेरी वड़ा रेसिपी


 

Milk vermicelli recipe



दूध सेंवई की रेसिपी



दुधातल्या शेवया


 

Thursday, May 11, 2023

कोकोनट बिस्किटे


 


कोकोनट बिस्किटे साहित्य :- 

  • १ वाटी मैदा 
  • १ वाटी लोणी किंवा डालडा 
  • पाऊण वाटी पिठीसाखर
  • १ चमचा व्हॅॅनिला 
  • अर्धा चमचा खायचा सोडा 
  • ५० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस 
  • थोडे दुध 
कृती :-
 

  • तूप व साखर एकत्र करून घेणे. नंतर त्यात मैदा, व्हॅनिला, खोबऱ्याचा कीस मिसळावे. 
  • सोडा घालावा. आवश्यक तेवढे दुध घालून पुरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. 
  • त्याची जाड पोळी लाटून गोल बिस्किटे कापावी. 
  • खोबऱ्याचा किसात एका बाजूने बुडवून ट्रेमध्ये लावून गरम ओव्हनमध्ये भाजावीत. 
  • तयार आहेत कोकोनट बिस्किटे. 

गव्हाच्या रव्याचा उपमा


 


गव्हाच्या रव्याचा उपमा बनवण्यासाठी साहित्य :- 

  • पाव किलो गव्हाचा जाडसर रवा 
  • १ वाटी चणाडाळ 
  • ४ चमचे खोबरे 
  • कोथिंबीर 
  • ४-५ हिरव्या मिरच्या 
  • मीठ 
  • अर्धी वाटी तेल 
  • चवीपुरती साखर 
  • फोडणीचे साहित्य
     
कृती :- 

  • गव्हाचा रवा थोड्या पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावा. डाळ भिजवून ती जाडसर वाटून घ्यावी. 
  • मिरची डाळीबरोबरच मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी. अर्धी वाटी तेलात हिंग, जिरे, हळद, मोहरी घालून फोडणी तयार करावी व त्यात वाटलेली डाळ परतून घ्यावी. 
  • नंतर त्या डाळीत शिजवलेला रवा, मीठ व चिमुटभर साखर घालून मंद्ग्नीवर परतावे. 
  • १५ मिनिटानंतर उपमा तयार होईल. त्यावर कोथिंबीर पसरून खाण्यास द्यावे. ह्यामध्ये मटार, काजू वैगेरे घालून स्वाद वाढवू शकता.  

Wednesday, May 10, 2023

दुधी भोपळ्याचा पराठा


 


आज आपण दुधी भोपळ्याच्या पराठ्याची साहित्य

आणि कृती बघणार आहोत. 

साहित्य :- 

  • ३०० ग्रॅम दुधी भोपळा 
  • ३ वाट्या कणिक 
  • १ चमचा तिखट 
  • १/२ चमचा हळद 
  • १ चमचा मीठ 
  • २ चमचे धणे-जिरे पूड 
  • १ चमचा गरम मसाला 
  • ४ चमचे डालड़्याचे मोहन 
कृती :- 

  • भोपळा किसून घ्यावा. 
  • पाणी पिळून बाजूला काढून ठेवावे. नंतर सर्व एकत्र करून पीठ भिजवावे.
  • पीठ घट्ट असावे. जरूर वाटल्या भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे. 
  • नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करून दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.  
 


मुळ्याचा पराठा


 

आज आपण मुळ्याचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. 

साहित्य :- 

  • २ ताजे किसलेले मुळे 
  • १/२ चमचे
    लाल मिरची 
  • १/२ चमचे वाटलेले अनारदाने 
  • १ कांदा बारीक कापलेला 
  • १ कापलेली हिरवी मिरची 
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर 
  • १ कप तूप तळण्यासाठी 
  • २५० ग्राम गव्हाचे पीठ 
  • १ चमचा तूप, पिठात मळण्यासाठी 
  • मीठ चवीनुसार 
कृती :- 

  • पिठात तूप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट मळावे. 
  • मळलेल्या पीठाचे बरोबर ६ गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजूस तूप लावून शेकावावे. 
  • दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे. 


Wednesday, April 5, 2023

खुसखुशीत बटाटा वडा Simple Recipies

Simple Recipiesखुसखुशीत बटाटा वडा रेसिपी तयार करणेसाठी खालील प्रमाणे कृती करा.
Simple Recipies

😋Simple Recipies

महत्त्वाची सामग्री

  • 2 कप बेसन
  • 3 चमचे तांदळाचं पीठ
  • आवश्यकतेनुसार मीठ
  • 1 चमचे मोहरीच्या बिया
  • 6/7 - हिरव्या मिरच्या
  • 2 चमचे कोथिंबीरीची पाने
  • 4 मध्यम बटाटा
  • आवश्यकतेनुसार हळद
  • 1 चमचे मिरची पावडर
  • 1 कप पाणी
  • आवश्यकतेनुसार लेमन
  • आवश्यकतेनुसार हिंग
  • 2 चमचे शेंगदाण्याचे तेल
Step 1: बटाटे मॅश करा 'Simple Recipies"

एका भांड्यामध्ये उकडलेले बटाटे घ्या आणि मॅश करा.



Step 2: मिरची, हिंग, मोहरीची फोडणी द्या.
        पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. त्यामध्ये हिंग, मोहरी, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. सर्व सामग्री दोन मिनिटांसाठी फ्राय करा."Simple Recipies"


Step 3: सर्व सामग्री बटाट्यामध्ये मिक्स करा.

फ्राय केलेली सामग्री मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करा. यामध्ये हळद आणि चिरलेली कोंथिबीर देखील टाका. चवीनुसार मीठही त्यात घालावे. सर्व सामग्री एकजीव करून घेतल्यानंतर आता छोट्या-छोट्या आकाराचे वडे तयार करून घ्या. तयार केलेले वडे बाजूला ठेवून द्या. Simple Recipies


Step 4: वड्यांसाठीचे पीठ."Simple Recipies"

एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, एक चमचा मीठ, चिमूटभर हळद आणि लाल तिखट एकत्र घ्या. यामध्ये पाणी ओता आणि सर्व सामग्री नीट मिक्स करा. जाडसर पीठ तयार करून घ्या. पिठामध्ये गाठी तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आता त्यात दोन चमचे गरम तेल मिक्स करा. यामुळे बटाटे वडे क्रिस्पी होतात.



Step 5: बटाटे वडे फ्राय करा

तयार केलेले वडे बेसनच्या पिठात बुडवून तेलामध्ये तळून घ्या. बटाटे वडे चांगल्या पद्धतीने फ्राय करा.


Step 6: गरमागरम घरगुती बटाटा वड्यांचा आस्वाद घ्या.

चटणी किंवा सॉससोबत तुम्ही बटाटा वड्यांचा आस्वाद घेऊ शकता.


अशा प्रकारे खुसखुशीत बटाटा वडा खाण्यास तयार .