Wednesday, May 10, 2023

मुळ्याचा पराठा


 

आज आपण मुळ्याचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. 

साहित्य :- 

  • २ ताजे किसलेले मुळे 
  • १/२ चमचे
    लाल मिरची 
  • १/२ चमचे वाटलेले अनारदाने 
  • १ कांदा बारीक कापलेला 
  • १ कापलेली हिरवी मिरची 
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर 
  • १ कप तूप तळण्यासाठी 
  • २५० ग्राम गव्हाचे पीठ 
  • १ चमचा तूप, पिठात मळण्यासाठी 
  • मीठ चवीनुसार 
कृती :- 

  • पिठात तूप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट मळावे. 
  • मळलेल्या पीठाचे बरोबर ६ गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजूस तूप लावून शेकावावे. 
  • दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे. 


No comments:

Post a Comment