Wednesday, May 10, 2023

दुधी भोपळ्याचा पराठा


 


आज आपण दुधी भोपळ्याच्या पराठ्याची साहित्य

आणि कृती बघणार आहोत. 

साहित्य :- 

  • ३०० ग्रॅम दुधी भोपळा 
  • ३ वाट्या कणिक 
  • १ चमचा तिखट 
  • १/२ चमचा हळद 
  • १ चमचा मीठ 
  • २ चमचे धणे-जिरे पूड 
  • १ चमचा गरम मसाला 
  • ४ चमचे डालड़्याचे मोहन 
कृती :- 

  • भोपळा किसून घ्यावा. 
  • पाणी पिळून बाजूला काढून ठेवावे. नंतर सर्व एकत्र करून पीठ भिजवावे.
  • पीठ घट्ट असावे. जरूर वाटल्या भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे. 
  • नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करून दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.  
 


No comments:

Post a Comment